पंचतंत्र कहाणी : माकड आणि लाकडी खुंटी

मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (12:59 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक मंदिर निर्माणाचे काम सुरु होते. त्या मंदिराच्या निर्माणमध्ये लाकडांचा उपयोग केला जात होता. तसेच लाकडांचे काम करण्यासाठी बाहेर गावावरून काही मजूर आले होते. एकदा असे झाले की, मजूर लाकूड कापत होते. तसेच सर्व मजूर जेवण करण्यासाठी जायचे. त्यावेळेस कापलेल्या लाकडाजवळ कोणीही न्हवते. तसेच मजूर लाकूड अर्धवट चिरून तसेच ठेऊन गेले. व त्या लाकडामध्ये खुंटी फसवून गेले, म्हणजे परत लाकूड कापण्यासाठी अवजार मध्ये घालावे लागणार नाही. तसेच हे सर्व तिथेच झाडावर बसलेली एक माकडांची टोळी पाहत होती. 
 
मजूर जेवणासाठी निघून गेल्यानंतर तिथे ती माकडांची टोळी येते. माकडांच्या टोळीमध्ये एक नटखट माकड होते. जो तिथे पडलेल्या वस्तू हलवायला लागला. माकडांच्या सरदाराने त्याला असे करू नको म्हणून सांगितले. तरीही ते माकड काही ऐकायला तयार नाही. व उद्या मारत मारत ते खुंटी घातलेल्या लाकडावर येऊन बसले. खुंटी पाहून ते माकड विचार करू लागले की, यामध्ये हे नक्की काय घातले आहे. व तो खुंटी बाहेर काढण्यासाठी ती ओढू लागला.
 
तसेच माकड जोरजोर्यात खुंटी हलवायला लागले. पण त्याला हे माहित न्हवते की, त्याची शेपुट त्या चिरलेल्या लाकडाच्या मधोमध आहे. माकड पूर्ण शक्ती एकवटून ती खुंटी बाहेर काढते. खुंटी निघाल्यानंतर त्याची शेपुट त्या लाकडामध्ये अडकते. माकडाला खूप वेदना होतात व तो मोठ्या मोठयाने हूप हूप करून ओरडू लागतो. वेदनेने व्याकुळ माकडाच्या डोळयात पाणी येते. सर्व माकड त्याच्या भोवती जमा होतात. तसेच आता मजुरांना येतांना पाहून माकड घाबरते व पळायचा प्रयत्न करते. यामुळे लाकडात अडकलेली त्याची शेपुट तुटून जाते. तसेच तो रडत रडत तुटलेली शेपुट घेऊन टोळीमध्ये परत येतो. इतर माकडे त्याची तुटलेली शेपटी पाहून त्याच्यावर हसतात. 
 
तात्पर्य- आपण इतरांच्या गोष्टींशी छेडछाड करू नये किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये. असे केल्याने आपलेच नुकसान होते.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती