देशस्थ ब्राह्मण Vs कोकणस्थ ब्राह्मण

देब्रांकडे पसारा असतो. पाहुणे आले की पसारा आणि पाहुणे यांत फरक कळत नाही.
कोब्रांकडे पसारा नसतो. पाहुणेही नसतात.
 
देब्रांकडे ६ जणांसाठी केलेला स्वयंपाक संपता संपत नाही. मग पुढच्या वेळी ते ४ जणांचाच स्वयंपाक करतात, फक्त त्यावेळी २ जणच जेवायला असतात हे मात्र विसरतात.
कोब्रांकडे पोट भरायच्या आतच स्वयंपाक संपतो. मग पुढच्या वेळी ते स्वयंपाक जास्त करत नाहीत, भूक कमी करतात.
 
 
देब्रांकडे संध्याकाळी गेले की चहा मिळतो. बरोबर लहान पोर असेल तर त्याबरोबर बिस्किटेही मिळतात. पोर हट्टाने बिस्किटे भरत राहते, आपल्याला काही बोलता येत नाही आणि रात्रीच्या जेवणाचे बारा वाजतात.
कोब्रांकडे फक्त संध्याकाळीच चहा मिळतो. बरोबर लहान पोर असेल तर 'प्रौढांस एक, लहानांस दोन' या हिशेबाने बिस्किटे मिळतात. पोराने ती संपवून आणखी मागितली तर 'रात्री जेवायचं नाही का ?' हा प्रश्न यजमानांकडूनच येतो. (बिस्किटे मात्र येत नाहीत.)
 
 
 
देब्रांना पैसे उधार मागितले की ते लगेच देतात. दिल्यावर एक आठवड्याने पैशांच्या परतीचा विषय काढतात, लाजत लाजत
कोब्रांना पैसे उधार मागितले की ते लगेच देतात. दिल्यावर एक दिवसाने आपल्याला पैशांची आठवण करून देतात.
 
हॉटेलात जायचं म्हटलं की देब्रा 'काय खाणार' विचारतात.
कोब्रा 'किती बिल होईल' विचारतात. परवडत दोघांनाही असतं किंवा नसतं!
 
देब्रा भेटले की खोचक प्रश्न विचारतात, "अहो, तुमच्या भावाने नोकरी का सोडली?"
कोब्रा भेटले की भोचक प्रश्न विचारतात "काय वहिनी, दीर आता घरीच असतो, तर घरकामात बरीच मदत होत असेल नाही!
 
 
 
लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा?
लाईट आल्यावर "आले " म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ , ... आणि जो लगेच मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ..

वेबदुनिया वर वाचा