बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'किंग' चित्रपटाबद्दल खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच त्याची मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या बाप-मुलीच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'किंग'च्या सेटवर एका अॅक्शन सीन दरम्यान शाहरुख खानला दुखापत झाली आहे. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या हाय-व्होल्टेज अॅक्शन सीनचे शूटिंग करताना शाहरुखला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे त्याला १ महिना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि काही काळासाठी शूटिंग थांबवण्यात आले आहे.
तसेच एका सूत्राने माध्यमांना सांगितले की, "दुखापतीची अधिक माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे, परंतु शाहरुख खान त्याच्या टीमसह तात्काळ उपचारांसाठी अमेरिकेला गेला आहे आणि ही गंभीर बाब नाही, तर स्नायूंना दुखापत आहे, कारण गेल्या काही वर्षांत सुपरस्टारने अॅक्शन सीन करताना त्याच्या शरीराच्या अनेक स्नायूंना दुखापत झाली आहे. 'किंग' चित्रपटाबद्दल आधीच बरीच चर्चा आहे. केवळ शाहरुख आणि सुहानाचा हा पहिलाच चित्रपट असल्यानेच नाही तर तो एक भावनिक-अॅक्शन ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे ज्यामध्ये शाहरुखची दमदार शैली दिसेल.