हिवाळ्यात आपल्या आहार विहाराच्या सवयी बदलतात. या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आहारातल्या बदलांमुळे आपलं वजनही वाढू शकतं. हिवाळ्या आपल्या शरीरातही अनेक बदल होतात. या दिवसात आपलं आरोग्य टिकवण्यासाठी गरज असते ती पोषक आहाराची. थंडीत शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरतं. त्यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवं. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते.....
* थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर अस्ताचाचं पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होतं. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येतं.
* ग्रीन टीचं सेवनही थंडीत उपयुक्त ठरतं. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी अॅक्सिडंट्स असतात. यामुळे अनेक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटीअॅक्सिडंट मदत करतात.