यूरिक एसिड वर रामबाण उपाय विड्याचे पान, जाणून घ्या कसा करावा उपयोग

शनिवार, 6 जुलै 2024 (16:48 IST)
Paan Patta In Uric Acid: यूरिक एसिडला योग्य आहारने नियंत्रित केले जाऊ शकते. हाय एसिडच्या रुग्णांसाठी विड्याचे पण खूप फायदेशीर आहे. यामुळे सूज कमी होते. जाणून घ्या कसा करावा उपयोग 
 
आयुर्वेद मध्ये विड्याच्या पानाचा उपयोग औषध म्हणून देखील केला जातो.  विड्याच्या पानामध्ये अनेक औषधीय गुण असतात.  पूजा-पाठ पासून तर अनेक आजरांकरिता विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो. यूरिक एसिड रुग्णांसाठी विड्याचे पण फायदेशीर असते. 
 
यूरिक एसिडच्या समस्येसाठी विड्याच्या पानाचा उपयोग-
विड्याचे पाने पाण्यात उकळून ते पाणी सेवन करावे. याकरिता दोन कप पाणी घ्या. त्यामध्ये 2-4 विड्याचे ताजे पान घालावे. आता हे उकळून घ्यावे व गाळून हे पाणी सेवन करावे. 
 
तसेच विड्याचे पान बारीक करून त्याचा रस काढावा. व हा रस कोमट पाण्यात मिक्स करून सेवन करावा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच विड्याचे पान तुम्ही चावून देखील खाऊ शकतात. यामुळे पानातील रस शरीरात जाईल ज्यामुळे यूरिक एसिड मध्ये फायदा होईल. 
 
विड्याचे पान खाण्याचे फायदे?
सुजणे कमी करते- विड्याच्या पानामध्ये पॉलीफेनोल्स आणि अनेक बायोएक्टिव कम्पाउंड असतात. जे अँटी-इंफ्लेमेटरी गुंणांनी भरपूर असतात. यामुळे सुजणे ही समस्या कमी होते.  
 
व्हिटॅमिन ए आणि सी ने भरपूर- विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. याशिवाय या पानांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स देखील असतात. जे त्वचेला फ्री रेडिकल्स पासून होणाऱ्या नुकसान पासून दूर ठेवतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती