न खातापिताही वजन वाढतंय? ही आहेत कारणं

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (23:30 IST)
आपण लठ्ठपणाचा किंवा वजन वाढण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात. एक म्हणजे अनारोग्यकारक अन्न म्हणजेच अनहेल्दी फूड आणि बैठी जीवनशैली.
 
पण वजन वाढण्यामागे आणखी एक कारण आहे. आणि बरेच लोक या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत.
 
म्हणजे आपण चांगला, पौष्टिक आणि सकस आहार घेतला तरी इतर कारणांमुळे आपलं वजन वाढू शकतं.
 
वातावरणातील काही घटक वजन वाढण्यात आणि लठ्ठपणासाठी कारणीभूत असल्याचं काही अभ्यासांमधून समोर आलंय.
 
या रासायनिक घटकांना 'ऑब्सोजेन्स' म्हणतात.
 
अन्न पचविण्याची क्षमता मंदावल्याने किंवा प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने आपलं वजन वाढू शकतं.
 
आतापर्यंत अशी 50 रासायनिक संयुगं समोर आली आहेत ज्यांना 'ऑब्सोजेन्स' किंवा 'संभाव्य ऑब्सोजेन्स' मानलं जातंय.
 
बिस्फेनॉल ए, पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स, पॉलीब्रोमिनेटेड डायफेनिल इथर, परफ्लुओरो अल्काइलेटेड घटक, पॅराबेन्स, ऍक्रिलामाइड, अल्किलफेनॉल, डिब्युटिल्टिन, कॅडमियम आणि आर्सेनिक यासारखे रासायनिक घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
 
धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व रासायनिक घटक आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या डिटर्जंट पावडर, खाद्यपदार्थ, प्लास्टिकचे डबे, कपडे आणि सौंदर्यप्रसाधने या वस्तूंमध्ये आढळतात.
 
या घटकांमुळे वजन कसं वाढतं?
हे घटक स्वतः वजन वाढवत नाहीत, तर वेगवेगळ्या मार्गाने हे घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
 
उदाहरणार्थ, ते ऍडिपोसाइट्स नावाच्या मेद पेशींना उत्तेजित करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर शरीरातील मेदासाठी जबाबदार असलेल्या पेशींचा आकार आणि संख्या वाढवतात.
 
पांढर्‍या ऍडिपोज टिश्यू (चरबी) ची वाढ एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या विकासाशी संबंधित रोगांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे शरीराच्या विविध अवयवांमध्ये विशेषतः यकृतामध्ये ग्लुकोज, आम्ल आणि मेद साठू लागतात.
 
त्याचप्रमाणे, या ऍडिपोसाइट्सच्या परस्परसंवादामुळे थायरॉईड संप्रेरकांच्या कार्यामध्ये बदल झाल्याचे आढळून आले आहे.
 
याव्यतिरिक्त, ही रसायने आतड्याच्या मायक्रोबायोटावर परिणाम करतात.
 
मायक्रोबायोटा हे कोट्यवधी बॅक्टेरिया आहेत जे कॅलिफॉर्म्स नावाच्या लिपिड्सचे शोषण नियंत्रित करतात. या बॅक्टेरियाची घट झाल्यास टाईप-2 मधुमेह किंवा लठ्ठपणा यासारख्या रोगांना आमंत्रण मिळते.
 
कॅलिफॉर्म्स लिपिड्सचे शोषण नियंत्रित करून कार्य करतात.
 
हा धोका कसा वाढतो?
आपण ऑब्सोजेन्सच्या संपर्कात कधी येतो यावर धोका अवलंबून असतो.
 
आपल्या आयुष्याचा प्रारंभिक टप्पा अत्यंत संवेदनशील असतो. एखाद्या व्यक्तीचा सर्वात जलद विकास हा गर्भाशयात असताना किंवा लहानपणी होत असतो. जर या काळात आपण ऑब्सोजेन्सच्या संपर्कात आलो तर त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात.
 
सुरुवातीच्या विकासादरम्यान आपण या रासायनिक घटकांच्या संपर्कात आलो तर शारीरिक बदल होऊ शकतात आणि व्यक्तीला आजीवन रोगांचा धोका उद्भवू शकतो.
 
वर नमूद केलेल्या गोष्टींचा थेट नसला तरी शरीरावर परिणाम होतोच.
 
अशाच उत्परिवर्तनामुळे लठ्ठपणा येऊ शकतो का? या प्रश्नाला वैज्ञानिक पुरावे यासाठी होकार दर्शवतात.
 
शारीरिक विकासाच्या काळात वर नमूद केलेल्या रासायनिक घटकांच्या संपर्कात आल्यास अनुवांशिक बदल होऊ शकतात. याला एपिजेनेटिक बदल म्हणतात.
 
शरीराच्या पेशींमध्ये असलेल्या जनुकांमधील गुणधर्म व्यक्त करण्याचा मार्ग बदलू शकतो. त्यामुळे ज्यामुळे पेशींची कार्यही बदलू शकतात. यामुळे लठ्ठपणा आणि इतर रोगांचा धोका देखील वाढू शकतो.
 
आता ही समस्या इथेच संपते असं नाही. प्राण्यांवर केलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, हे बदल पुढील पिढ्यांमध्ये टिकून राहतात. त्यामुळे या बदलांना आनुवंशिक बदल असंही म्हणता येईल.
 
ऑब्सोजेन्स पासून सुरक्षित कसं राहायचं?
वर सांगितल्याप्रमाणे, ऑब्सोजेन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. आपण काही गोष्टी टाळून यापासून अंतर राखू शकतो.
 
बिडी सिगारेट ओढू नका
हवाबंद पदार्थ (पॅकेज फूड) आणि शीतपेयांचा वापर कमीत कमी करा
प्लास्टिक, सौंदर्यप्रसाधने आणि लोशनचा वापर कमीत कमी करा
कीटकनाशकं असलेल्या उत्पादनांचा वापर कमी करा
शक्य तितक्या वस्तूंचा पुनर्वापर करा
महत्त्वाचं म्हणजे, सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा पदार्थांच्या मर्यादित वापराबाबत धोरण तयार करायला हवं. आरोग्य क्षेत्रातील सध्याच्या सामाजिक असमानतेकडेही लक्ष दिलं पाहिजे.
 




Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती