वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.
उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे.
सकाळ- संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ चूर्ण मिसळून सेवन केले पाहिजे.
शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.
खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावा. काही वेळाने स्नान करा. खाजेपासून मुक्ती मिळेल.