कोणा व्यक्तीस मूळव्याध झाली असल्यास पण रक्त पडू शकते. फिशर, बद्धकोष्ठता, जंताचा त्रास, पोटात इन्फेक्शन, अल्सर, मोठ्या किंवा लहान आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले असल्यास, किंवा पोटाचे, गुदेचे, आतड्यांचे, मलाशयाचे कॅंसर असल्यास पण रक्त येऊ शकते.
जर का बऱ्याच दिवसांपासून हा त्रास होत असेल, शौचेतून रक्त येत असेल तर अंगावर काढू नका. रक्त पडताना किंवा शौच क्रियेच्या वेळी पोट दुखत असल्यास, वजन वारं-वारं कमी होत असल्यास, जुलाब, उलट्यांचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरला दाखवून वेळेत औषधोपचार घ्यावे. बद्धकोष्ठतेसाठी काही घरघुती उपाय
घरच्या ताज्या लोण्यात साखर घालून दिवसांतून 3 -4 वेळा खावे.
एरंडेल तेल
कणकेत 1 -2 चमचे एरंडेल तेल टाकून त्याची पोळी खाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.