आपणास देखील जेवून लगेच झोपण्याची सवय असल्यास हे वाचा.
बहुतेक लोकांची सवय असते जेवण केल्यास त्वरितच झोपायची. तसेच व्यस्त दिनचर्येमुळे, दिवसभराच्या दगदगी मुळे शरीर थकल्याने थोड्या वेळ फिरणे सुद्धा त्यांच्यासाठी शक्य नसतं. त्या कारणास्तव रात्रीचे जेवण केल्यावर त्यांचे पाय आपसूकच पलंगाकडे वळतात. पण जेवण केल्यावर लगेच झोपल्यावर आपल्या आरोग्यास तोटा संभवतो.
* जेवण केल्यावर लगेच झोपल्यानं पोटाचे विकार संभवतात या मुळे जेवण पचतं नाही जेणे करून ऍसिडिटी, पोटदुखी, छातीत जळजळ सारखे त्रास सुरु होतात. म्हणून जेवण करून लगेचच झोपू नये. काही वेळ फिरावे. मगच झोपायला जावं.