जीममध्ये गेल्यावर ट्रेडमिलवर धावण्याला अनेकांची पसंती असते. अनेकांच्या घरातही ट्रेडमिल असतं. आता हे ट्रेडमिल वापरताना त्याचे हँडल धरावं किंवा नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात ट्रेडमिलवर व्यायाम करताना हँडल धरणं योग्य नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ट्रेडमिलचं हँडल फक्त तुमच्या सुरक्षेसाठी असतं. हँडल धरल्याने आपण खूप जोरात धावत आहोत, असं तुम्हाला वाटतं. पण याचा परिणाम तुमच्या शरीरातल्या ऊर्जेवर होत असतो. हँडल धरून धावल्यामुळे तुम्हाला दमल्यासारखं वाटतं.