रोज सकाळी सफरचंद खाल्ल्यास, 10 आरोग्यदायी फायदे मिळतील

मंगळवार, 16 एप्रिल 2024 (07:00 IST)
सफरचंद एक पौष्टिक फळ मानले जाते आणि सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. या लेख मध्ये, आपण सकाळी रोज सफरचंद खाल्यास काय फायदे मिळत हे जाणून घेणार आहोत. 
 
सकाळी सफरचंद खाण्याचे फायदे-
1. पाचनतंत्र सुरळीत ठेवते- सफरचंदमध्ये असलेले पेक्टिन नावाचे घुलनशील फायबर पाचनतंत्र चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच बद्धकोष्ठता पासून अराम देते. 
 
2. वजन कमी करण्यासाठी सहायक- सफरचंद मध्ये कॅलरीचे प्रमाण अमी असते. तसेच फायबरचीचे प्रमाण चांगले असते, जे तुमचे पोट अनेक वेळ भरलेले ठेवते म्हणजे पोट भरलेले वाटते. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील सहायक असते. 
 
3. ब्लडशुगर नियंत्रण- सफरचंद मध्ये असलेले फायबर आणि पॉलीफेनोल्स रक्तचाप स्तर नियंत्रित ठेवायला मदत करतात. सफरचंद मधुमेहाच्या लोकांसाठी फायदेशीर असते. 
 
4. कोलेस्ट्रॉल कमी करते- सफरचंद मध्ये असलेले पेक्टिन कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला कमी करण्यासाठी मदत करतात. हे आरोग्यदायी हृदय ठेवण्यासाठी मदत करते. 
 
5. लिव्हर आरोग्यदायी बनवते- सफरचंद मध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट लिव्हरला डिटॉक्स करणे आणि नुकसान होण्यापासून वाचवते. 
 
6. कँसर पासून वाचवते- सफरचंद मध्ये असलेले पॉलीफेनोल्स कँसर पासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तसेच सफरचंदाचे सेवन हे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका होण्यापासून वाचवते. 
 
7. रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते- सफरचंद मध्ये असणारे व्हिट्यामिन C आणि अँटीऑक्सिडेंट रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते. 
 
8. त्वचेच्या आरोग्यामध्ये सुधारणा- सफरचंद मध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडेंट त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. हे सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि इतर त्वचेच्या मस्य कमी करण्यासाठी मदत करते. 
 
9. केसांचे आरोग्य चांगले ठेवते- सफरचंद मध्ये असलेले बायोटिन केसांच्या आरोग्यात सुधारणा करते. हे केसांची गळती बंद करून केसांना मजबूत बनवते व नवीन केस येणाया मदत करते. 
 
10. आरोग्ययी मेंदू- सफरचंदमध्ये असलेले क्वेरसेटिन नावाचे अँटीऑक्सिडेंट मेंदूच्या आरोग्यात सुधारणा करते. हे स्मरणशक्ती वाढवते आणि अल्जाइमर आजारासारख्या न्यूरोडीजेनेरेटिव आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. 
 
तसेच काही लोकांना एसिडिटीची समस्या असते. रिकम्या पोटी सफरचंद खाल्याने अश्या लोकांना एसिडिटी होऊ शकते. काही वेळेस सफरचंदमध्ये असणारे फायबर काही लोकांना गॅसची समस्या निर्माण करू शकतात. अधिक प्रमाणात सफरचंद खाल्ल्यास मलप्रवृत्तीची समस्या निर्माण होऊ शकते. 
  
सफरचंद रिकाम्यापोटी खाण्याची योग्य पद्धत- 
सकाळी रिकाम्या पोटी माध्यम आकाराचे सफरचंद धुवून खावे. सफरचंदला चांगल्या प्रकारे चावून चावून खावे. सफरचंद खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीबाही होऊ नये. जर तुम्हाला सफरचंद खाल्ल्यानंतर चांगले वाटत नसेल किंवा काही समस्या निर्माण होत असेल तर, सफरचंद खाऊ नका. रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, आता सेवनाने काही दुष्परिणाम देखील होतात. याकरिता, सफरचंद खातांना आपले आरोग्य आणि होणारे दुष्परिणाम यांवर लक्ष द्यावे. जर काही समस्या येत सेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती