मसाज करण्याचे नियम

ND
ND
मसाज करणे ही आपल्या शरीराच्या दृष्टीने फायदेशीर असते. मात्र मसाज करण्याचे काही नियम आहेत. डोक्याचा अथवा सर्वांगाचा मसाज करण्यापूर्वी ते नियम आत्मसात करणे आवश्यक ठरते. अन्यथा मसाजाचा फायदा होऊ शकणार नाही.

1. सकाळच्या वेळी छतावर अथवा हवेशीर खोलीत सपाट जमिनीवर दरी किंवा चटाई अंथरून त्यावर व्यवस्थीत झोपून मसाज करावा. मसाज करते वेळी एकाग्र चित्त ठेवावे. कोणाशीही बोलू नये.

2. मसाज करताना हातांची दिशा खालच्या बाजुने वरच्या बाजूला येणारी पाहिजे. असे करताना पाठीवरील लय तुटण्याची शक्यता असते. पाठीवर हलक्या हाताने मसाज करावा. खालून वरच्या बाजुला हात फिरविल्याने हृदयाला चांगला रक्त पुरवठा होतो.

3. मसाजची सुरवात पायांपासून करावी. 25 ते 45 मिनिटांपर्यंत मसाज करावा. त्यांनतर थोडी विश्रांती घेऊन स्नान केला पाहिजे.

4. ज्या तेलाने मसाज करायचा आहे ते काचेच्या बाटलीत ठेऊन 6 ते 7 तास उन्हात ठेवावे.

5. मसाज झाल्यानंतर लगेच उन्हात अथवा थंडीत बाहेर पडू नये. मसाज करण्यापूर्वी काहीच खाऊ नये. त्यासाठी प्रात:र्विधीनंतर व स्नान करण्यापूर्वी मसाज केला पाहिजे. मसाज झाल्यानंतर शवासनात जमिनीवर लेटून 25 ते 30 मिनिटे विश्रांती घ्यावी. शरीर थंड झाल्यानंतर स्नान करावे. त्यानंतर सुती टॉवेलने तेलकट शरीर पुसून घ्यावे.

6. ताप, खोकला, जेवण झाल्यानंतर, उपवास, उलटी, हगवण, थकवा आला असेल, अत‍ि जागरण व अजीर्ण झालं असल्यास मसाज करणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा