संसाराचा गाडा ओढण्यासाठी पुरूष नावाच्या चाकाला मोलाचे सहकार्य करणारे महिला नावाचे चाकही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. या दोन चाकामधील महिला नावाचे चाक नादुरस्त झाले तर संपूर्ण परिवार पांगळा होतो. त्यामुळे कुटुंबातील महिलेचे आरोग्य उत्तम असेल तरच कुटुंब सुखी व आनंदी राहू शकते. कुटुंबाच्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेता घेता ती स्वत:च्या आरोग्याची तब्बेतीकडे दुर्लक्ष करते.
आज विज्ञानाने कर्करोगावर अत्याधुनिक उपचार शोधून काढले आहेत. त्यामुळे 'कर्करोग म्हणजे मृत्यू' हे विधानच खोडून काढले आहे.
कर्करोग हा एक असा आजार आहे की, तो केवळ उच्चारला तरी अंगावर शहारे येतात. अशा या भयानक आजाराने भारतातील हजारोंच्या वर महिला पीडीत आहेत. जगात दरवर्षी कर्करोग होणार्या 1 लाख लोकांमध्ये 18 टक्के भारतातील असतात. महिलांना होणार्या कर्करोगामध्ये मुख, गर्भाशय व स्तन या अवयवांच्या कर्करोगाचे प्रमाण 40 टक्के आहे.
कालपर्यत कर्करोग म्हणजे मृत्युची पायरी, असे म्हटले जायचे. कर्करोग झालेला व्यक्ती भीतीनेच जगण्याच्या सर्व आशा सोडून देत होता. परंतु, आज विज्ञानाने कर्करोगावर अत्याधुनिक उपचार शोधून काढले आहेत. त्यामुळे 'कर्करोग म्हणजे मृत्यू' हे विधानच खोडून काढले आहे. वेळेत आवश्यक त्या चाचण्या केल्याने कर्करोगावर मात करता येऊन व्यक्ती बरा होऊ शकतो.
* पॅप स्मीअर गर्भाशयाचा कर्करोग झाला असल्याचे निदान करण्याकरता एक विशेष चाचणी अलीकडच्या काळात उदयास आली आहे. तिला विज्ञानाच्या भाषेत 'पॅप स्मीयर टेस्ट' म्हटले जाते. ही चाचणी करण्यासाठी गर्भाशयातील पेशींचा एक छोटाचा भाग नमूना म्हणून घेतला जातो. त्या नमून्याचा सुक्ष्मदर्शक यंत्राद्वारा अध्ययन करून गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान केले जाते. पॅप स्मीअर टेस्टमध्ये महिलेला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही व अल्प कालवधीत होणारी ही टेस्ट आहे.
* त्याचे फायदे 'पॅप स्मीअर टेस्ट'च्या माध्यमातून वेळेतच गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होते. कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेतच निदान होत असल्याने उपचार करण्यासाठी भरपूर वेळ हातात राहतो.
* केव्हा करायची असते टेस्ट तसे पाहिले तर दरवर्षी महिलांनी पॅप स्मीअर टेस्ट केली पाहिजे. कारण कर्करोगाचे वेळेतच निदान झाल्याने उपचारात अडचणी निर्माण होत नाही. सतत 3 वर्षांपर्यंत रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ही टेस्ट 2 वर्षांच्या अंतराने करावी.