कटीस्नान

खोल अशा विशिष्ट प्रकारच्या म्हणजेच साधारणत: तीन फूट लांब, दोन त अडीच फूट रुंद अशा टबमध्ये बेंबीपर्यंत येईल इतपत पाणी भरावे. उष्ट, थंड दोन्ही प्रकारच्या पाण्याने कटिस्नान करणे शक्य असते. उन्हाळ्यात सुमारे 20-30 मिनिटे या पाण्यात बसावे. शरीराचा बेंबीखालचा म्हणजेत ओटीपोटाचा भाग आणि मांड्याचा थोडा भाग पाण्यात बुडालेला असावा, धडाचा इतर भाग आणि पाय टबच्या बाहेर असावेत. टबमध्ये बसल्यानंतर टर्कीश टॉवेलने ओटीपोटीच्या भागाला हळूहळू घासत राहावे. थंड कटिस्नानासाठी सहन होईल इतपत थंड पाणी टबबाथमध्ये भरावे. टबमध्ये बसण्यापूर्वी शरीरात थोडी ऊब निर्माण होण्यासाठी मालिश करावी, थोडा व्यायाम करावा अथवा टॉवेलने अंग घासावे. ग्लासभर गरम पाणी पिणेही हितावह ठरते. नंतर गार पाण्याच्या टबमधून बाहेर पडून कोरड्या टॉवेलने अंग पुसून कपडे घालावेत आणि गरम पांघरुण घेऊन झोपावे. आलटून पालटून उष्ण आणि थंड कटिस्नानही करता येते.

कटिस्नानाचे फायदे
जठर, यकृत, प्लीहा, आतडी इत्यादी पचन क्रियेचे अवयव तसेच मूत्रपिंडेही कार्यक्षम होतात. ताजेतवाने आणि प्रसन्न वाटते, आरोग्य सुधारते.

लक्षात ठेवा
कटिस्नान रिकाम्या पोटीच घ्यावे. कटिस्नानानंतर अर्धा तास काही खाऊ नये. पोटदुखी, अनियमित मासिक पाळी, अकाली बंद झालेली पाळी या व्याधींमध्ये आलटून पालटून गार आणि गरम पाण्याने कटिस्नान करावे.

कटिस्नान आरोग्यासाठी आवश्यक आहे. म्हरून किमान वर्षातून एकदातरी ते अवश्य करावे.

वेबदुनिया वर वाचा