Astro Tips for Money : पैशांची चणचण, पैशाची हानी, उधळपट्टी अशी समस्या सामान्य आहे. बहुतेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. याची अनेक कारणे आहेत. पैशाचे योग्य व्यवस्थापन न करणे याशिवाय घरातील दोष, कुंडलीतील दोष, वाईट सवयी देखील पैशाच्या कमतरतेला कारणीभूत असतात. ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. या उपायांमुळे उत्पन्न वाढते, अनावश्यक खर्चापासून बचत होते, पैशाची हानी होते.
धनाची देवी लक्ष्मीला दक्षिणावर्ती शंख अतिशय प्रिय आहे. हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. घराचा खर्च अनावश्यकपणे वाढत असेल आणि त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसेल तर गुरुवारी दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध भरून भगवान विष्णूला अभिषेक करावा. यामुळे अनावश्यक खर्चापासून दिलासा मिळेल आणि पैसे येण्याचे मार्ग वाढतील.