प्रत्येक माणसाला आपल्या कर्माचे फळ भोगावंच लागतं मग ते शुभ असो वा अशुभ. पूर्व संचित कर्माचे शुभ फळ जेव्हा अधिक होते तेव्हाच आपल्याला राजयोग प्राप्त होतो आणि राजनितीत प्रवेश करणं हे या राजयोगामुळेच घडतं. राजकारणात प्रत्येक व्यक्ती प्रवेश करू शकत नाही किंवा सामान्य व्यक्ती त्यात सफल होईलच असं देखील नाही. राजकारणातील यशासाठी विशेष ग्रह दशा आणि गुरू, ईश्वर आणि ग्रहांची विशेष कृपा असावी लागते.
बुध : बुध हा बुद्धी आणि धन देणारा मुख्य ग्रह आहे. शासन चालवण्यासाठी शारीरिक नव्हे तर बौद्धिक आणि मानसिक शक्तीचीच आवश्यकता असते; ज्याचा मालक बुध आहे. तर दुसरीकडे बुध धन प्रदान करणारा एक मुख्य ग्रहही आहे आणि आजच्या राजकारणात धनाशिवाय सफलता असंभव नसली तरी कठीण मात्र नक्कीच आहे. त्यामुळे राजकारणातील यशासाठी बुध प्रमुख ग्रह आहे.
राहू : राहू कुटनीती आणि तार्किक क्षमता प्रदान करणारा ग्रह आहे. तसं तर नीती आणि कुटनीतीशिवाय राजकीय कल्पना करताच येणार नाही. तर्कवितर्काशिवाय राजनीतीत टिकाव धरणं कठीणच! जगात देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रखर कुटनीती आवश्यक आहे आणि देशात सफलतापूर्वक राज्य करण्यासाठी नीती व नियमांची विशेष गरज आहे. म्हणूनच राजनीतीत राहू सफलता देणारा ग्रह आहे.