टाटा समूहाकडे एअर इंडियाची कमान पुन्हा आल्यापासून एकामागून एक मोठे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी करण्यावर टाटा समूहाकडून भर दिला जात आहे. आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑर्डर बुक केल्यानंतर आता एअर इंडियामध्ये हजारो पदांसाठी पुन्हा मोठी भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या 6 महिन्यात सुमारे 3 हजार 800 जणांना नोकरी दिल्यानंतर आता पुन्हा एअर इंडियाकडून विविध पदांसाठी मोठी भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यात इंजिनिअर्सना संधी असल्याचे म्हटले जात आहे.
पायलट म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या आणि हवाई वाहतुकीशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. टाटा उद्योगसमुहाकडून त्यांच्या एअर इंडिया कंपनीमध्ये हजारो जागांसाठीची लवकरच भरती जाहीर करण्यात येणार आहे. काही अहवालांनुसार, कंपनीला 6 हजार 500 पेक्षा जास्त पायलट, अभियंते आणि क्रू मेंबर्सची गरज असून, लवकरच एअर इंडियामध्ये पुन्हा भरती सुरू होणार आहे.
एअर इंडियाने (AI) गेल्या सहा महिन्यांत क्रू आणि इतर कामांमध्ये 3,800 हून अधिक कर्मचारी जोडले आहेत. तसेच, एअरलाइनने आपल्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांसाठी 29 नवीन धोरणे आणली आहेत.