जे विद्यार्थी व्यायवसायिक अभ्यासक्रम शिकले आहेत, आणि सरकारी नोकरीची वाट बघत आहे, त्यांना नोकरी मिळविण्याची ही सुवर्ण संधी आहे. नीती आयोगाने यंग प्रोफेशनल च्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे. तरुण व्यायसायिक म्हणून काम करण्याच्या इच्छुक आणि योग्य उमेदवार नीती आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर niti.gov.in जाऊन अर्ज करू शकतात.
बीई / बीटेक किंवा 2 वर्षांचा पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट, एमबीबीएस, एलएलबी, सीए, आयसीडब्ल्यूए या पैकी काही एक पदवी असणे आवश्यक आहे. किंवा 4 वर्षाच्या अभ्यासानंतर कोणतीही व्यावसायिक पदवी असणे आवश्यक आहे. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी धारकांना प्राथमिकता देण्यात येईल.
पदांची संख्या आणि वयोमर्यादा -
नीती आयोगाने यंग प्रोफेशनल ऑफिसरच्या 10 पदांसाठी अर्ज मागविले आहे. ज्यामध्ये करार आधारित नियुक्ती दोन वर्षासाठी केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 32 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज असा करावा-
यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 24 जानेवारी,2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आम्ही सांगू इच्छितो की या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही हे पूर्णपणे विनामूल्य आहे.