World Environment Day Special: कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे अन्नाचे ताट झाले विषारी

रविवार, 5 जून 2022 (10:33 IST)
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.असा एक खास दिवस जेव्हा आपण पर्यावरण रक्षणा बद्दल विचार करतो, लोकांना त्याबद्दल जागरूक केले जाते. स्वच्छ वातावरण आणि उत्तम आरोग्य हे समांतर आहेत, त्याला पूरकही म्हणता येईल. म्हणजेच, एकाची दुसऱ्याशिवाय कल्पना करणे थोडेसे निरर्थक ठरेल. मात्र, आधुनिकता,औद्योगिक क्रांती आणि अमर्याद गरजांमुळे आपल्या अस्तित्वाचा एक भाग कमकुवत झाला आहे.

जलद विकासाच्या आग्रहाने आपण इतके आतुर झालो आहोत की आजच्या घडीला आपण आपल्याच भविष्याशी खेळत आहोत. गेल्या काही दशकांपासून पर्यावरणावर जे अत्याचार होत आहेत,त्या मुळे अन्नापासून श्वासापर्यंत सर्वत्र प्रदूषण आणि विषबाधा दिसून येत आहे.
 
आरोग्याच्या दृष्टिकोनातून, पर्यावरणातील वाढते प्रदूषण आणि रसायने आपल्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू लागली आहेत. अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की वातावरणातील विषाक्तता वाढल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढत आहे. हवा, पाणी, माती आणि आपल्या अन्नामध्ये रसायनांचे वाढते प्रमाण हे कर्करोगास कारणीभूत असणारे प्रमुख पर्यावरणीय घटक आहेत. 
 
अन्नातील वाढती विषाक्तता आणि त्याचे दुष्परिणाम बद्दल जाणून घेऊ या.
पर्यावरणीय प्रदूषण आणि विषबाधा बद्दल बोलत असताना, विचार नेहमी वायू प्रदूषणाकडे जातो.मातीचे प्रदूषण देखील एक घटक आहे ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. 
 
वेगाने शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे वातावरणात आणि मातीत धातूंचे प्रमाण वाढत असल्याने कोलन कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.  
 
या प्रकारच्या मातीत उगवलेली पिके देखील यातील काही विषारीपणा टिकवून ठेवतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे आरोग्य धोके वाढतात. 
 
पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण सर्व प्रकारची रसायने-खते वापरतो. यापैकी अनेकांवर बंदी देखील आहे. त्यांच्या वापरामुळे माती आणि पीक दोन्हीमध्ये विषारीपणा वाढतो. अशा परिस्थितीत त्या जमिनीतून मिळणारे उत्पन्न आणि त्या पिकांचा वापर जाणूनबुजून किंवा नकळत आपल्याला घातक कॅन्सरच्या जवळ घेऊन जातो.  
 
अनेक संशोधनांमध्ये, शास्त्रज्ञांना आपल्या दैनंदिन आहारात अशा सिंथेटिक्सची उपस्थिती आढळून आली आहे ज्यामुळे थेट यकृताचा कर्करोग होतो. पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नायट्रेट क्षार, सोडियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ते पर्यावरणाला हानिकारक तर आहेतच, पण अन्नातून विषबाधा होऊन अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढवतात. 
 
आणि पिकांमध्ये रसायनांचा वाढता वापर यामुळे केवळ कॅन्सरच नाही तर इतर अनेक आजारांचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. जे धान्य आपण आरोग्यदायी म्हणून खात आलो आहोत, त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकाचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, अशा अनेक रसायनांची फवारणी केली जाते.जी अनेक देशांनी अत्यंत हानिकारक मानली आहे. डीडीटी हे असेच एक कीटकनाशक आहे जे पिकांचे रोगापासून संरक्षण करण्यासाठी फवारले जाते,
 
फळे आणि भाज्या आकर्षक दाखवून चांगला भाव मिळवण्याचा ट्रेंड बाजारात आहे पण काही वर्षांपूर्वी ही कुरूप आणि छोटी दिसणारी फळे अचानक इतकी आकर्षक कशी बनली? त्यासाठी काही शेतकरी आणि पुरवठादार हानिकारक रसायने वापरतात, काही फळांमध्ये इंजेक्शन देतात, जेणेकरून ते अधिक काळ ताजे दिसावेत. फळपिकांमध्ये औषधांचा वापर करून त्यांना संकरित बनवले जात आहे, त्यामुळे ते दिसायला सुंदर आणि आकाराने मोठे असले तरी त्यांची विषारीता जास्त असून त्यांचे पोषणमूल्य कमी होत आहे.
 
अभ्यास दर्शविते की कॅल्शियम कार्बाइडचा वापर फळांना आकर्षक बनवण्यासाठी आणि वेळेपूर्वी पिकवण्यासाठी केला जातो.संशोधनात असे आढळून आले आहे की पिकलेल्या फळांचे सेवन केल्याने हायपोक्सियाचा धोका होऊ शकतो, ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, झोपेचे विकार, स्मरणशक्ती कमी होणे, पाय आणि हात सुन्न होणे आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे उदभवू शकतात.
 
पर्यावरणीय दृष्टिकोनातून, अभ्यासात आढळून आले आहे की कॅल्शियम कार्बाइड पाणी गंभीरपणे दूषित करते. कॅल्शियम कार्बाइड पाण्याशी विक्रिया करून अॅसिटिलीन तयार करते. अॅसिटिलीन, ज्याला इथिन असेही म्हणतात, हे हायड्रोकार्बन साखळीचे सदस्य आहे. वातावरणात त्याचे प्रमाण वाढले तर तीव्रपणे 
जीव गुदमरण्याची समस्या उद्भवू शकते.याच्या संपर्कात आलेल्या लोकांना चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, टेककार्डिया (अनियमित हृदयाचा ठोका), मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. जास्त प्रमाणात घेतल्याने बेशुद्ध पडण्याचा आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूचा धोका देखील वाढू शकतो.
 
पर्यावरण आणि अन्न विषबाधा टाळण्यासाठी काय करावे?
कोणतीही फळे आणि भाजीपाला खाण्यापूर्वी, ते पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा, जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारे विषारीपणाचे चिन्ह राहणार नाही. असे केल्याने होणारे नुकसान कमी करता येते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती