जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा

बुधवार, 1 जून 2022 (09:42 IST)
जन्म घेतो आपण, एका सुरक्षित छत्रछायेत,
न चिंता, काळजी, वाढतो फक्त ममतेत,
योग्य संस्कार, भल्या बुऱ्याची जाण, शिकवली जाते,
मोठ्यां प्रती आदराची भावना, रुजविली जाते,
बहीण भावंडे जुळवून घ्यायला शिकतो,
जssरा डोळे मोठे दिसले, की वरमायला शिकतो,
काळ वेगानं पुढं जातो, भूमिका बदलतात,
एक दिवस आपण पालक होतो, दिवस पालटतात,
तोच क्रम आपण ही जवाबदारीनं राबवतो,
अन पालक म्हणून आपण ही धन्य धन्य होतो!!
...अश्विनी थत्ते
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती