मंदिर जुनं पण पुजारी म्हणून चक्क रोबोट करतोय हे काम

मंदिरात गेल्यावर आपल्या दृष्टीस पुरुष पुजारी पडतात. अनेक मंदिरात महिला देखील पुजारी म्हणून वावरताना दिसतात परंतू आपण कधी रोबोटला पुजारीचे काम करताना बघितले आहेत का? होय हे खरं आहे एका रोबोटला जपानमधील एका 400 वर्ष जुन्या बौद्ध मंदिरात पुजारी म्हणून नेमले गेले आहे.
 
या रोबोचे नाव अँड्रॉयड कॅनन असे असून त्याला क्योटोच्या कोदाइजी मंदिरात नेमण्यात आले आहे. येथे रोबोट हात जोडून प्रार्थना करतो आणि येणार्‍या भक्तांना दया आणि करुणाबद्दल शिकवतो. तसेच मंदिरातील इतर पुजारी रोबोटच्या कामात हातभार लावतात.
 
मंदिराचे एक पुजारी टेन्शो गोटो यांनी सांगितले की हा रोबोट कधीही मरणार नाही. तर कालांतराने तो स्वत:ला विकसित करेल, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. रोबोटकडून बदलत असलेल्या बौद्ध धर्मानुसार आपलं ज्ञान वाढवेल ही अपेक्षा आहे ज्यानेकरुन लोकांना त्याच्या सर्वात कठिण संकटांतून बाहेर काढण्यास मदत होईल. 
 
हा रोबोट सुमारे सहा फूट उंच असून त्याचे हात, चेहरा आणि खांदे अगदी मानवी त्वचेसारखे दिसणारे सिलिकॉनने तयार केलेले आहे. तरी दिसण्यात तो रोबोट असल्याचं स्पष्ट जाणवतं. 
 
या रोबोटला तयार करण्यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च झाले आहेत. याला ओसाका विश्वविद्यालयाचे प्रसिद्ध रोबोटिक्स प्रोफेसर आणि जेन टेंपलच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. हा रोबोट लोकांना क्रोध आणि अहंकाराचे दुष्परिणामांविषयी देखील सांगतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती