2. शाहू महाराजांनी आपल्या आदेशात म्हटले होते की त्यांच्या राज्यातील कोणत्याही कार्यालय आणि ग्राम पंचायतमध्ये दलित आणि मागासवर्गीयांसह समानतेचे व्यवहार झाला पाहिजे. अस्पृश्यता सहन केली जाणार नाही. दलित लोकांशी मानवीय व्यवहार केला गेला पाहिजे. मनुष्याला मनुष्य समजणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास संभव नाही.
4. जाती व्यवस्था ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली आहे. भेद मिटविण्यासाठी शाहू महाराजांनी एका अस्पृश्य गंगाधर काम्बले कडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वत: त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे ब्राह्मणवादी जाती व्यवस्थेविरुद्ध सर्वात मोठे साहसी पाऊल होते.