विराट - शास्त्रीची चौकशी करण्याची शक्यता

मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (08:55 IST)
पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे नाराज झालेल्या बीसीसीआय तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआय विराट कोहली-रवी शास्त्रीची चौकशी करण्याची शक्यता आहे. बर्मिंगहॅम कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत डावाने पराभव स्विकाराला लागला. या कसोटीत भारतीय फलंदाजांनीही निराशानजक कामगिरी झाली आहे. 
 
रवी शास्त्री यांच्यासोबत सहायक प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. श्रीधर यांनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर, भारतीय खेळाडूंच्या स्लिपमध्ये झेल सोडण्याच्या प्रमाणात वाढं झाली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ५० झेल सोडले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती