हार्दिकने 24 चेंडूत एका चौकार आणि तीन षटकारांसह 28 धावा काढल्यानंतर बाद झाला. हार्दिक बाद झाल्यानंतर केएल राहुलने मॅक्सवेलच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यासह, भारताने सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात पोहोचण्यातही संघ यशस्वी झाला होता. राहुलने 34चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 42 धावा काढल्या, तर जडेजाही दोन धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी दोन, तर बेन द्वारशुइस आणि कूपर कॉनोली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.