नाशिक येथील रहिवासी असलेल्या इंजिनिअरने चक्क बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. नाशिक येथील सेझ प्रकल्प असलेल्या इंडिया बुल्स येथे इंजिनिअर म्हणून ब्रम्हचारी म्हणून काम करत आहेत. हा अर्ज बीसीसीआय कडे गंमतीचा विषय जरी असला तरी पूर्ण देशात या अर्जावरून सोशल साईटवर पुन्हा विराटवर टीकेची झोड उठली आहे. तर राष्ट्रीय माध्यमांनी पुन्हा वादाचा मुद्दा लावून धरला आहे.