Joe Root News : जो रूट गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहे आणि दिवसेंदिवस अधिक चांगले होत आहे. सध्या तो जगातील अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांनी प्रत्येक मैदानावर आपल्या फलंदाजीने आपली छाप सोडली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला नसला तरीही त्याने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात जो रूटला आपले खातेही उघडता आले नव्हते. आता दुसऱ्या डावात त्याने नाबाद 25 धावा केल्या, जो सामन्यातील चौथा डाव होता. यासह तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. जो रूटने कसोटीच्या चौथ्या डावात आतापर्यंत एकूण 1630 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर 1625 धावा आहेत. जो रूटने 2012 मध्ये इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते
ॲलिस्टर कुक- 1611
ग्रॅम स्मिथ- 1611
शिवनारायण चंद्रपॉल- 1580
न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 104 धावांचे लक्ष्य दिले, जे इंग्लिश संघाने अगदी सहज गाठले. या कसोटी सामन्यात हॅरी ब्रूकने इंग्लंडकडून १७१ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय गोलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण ओली पोपने सादर केले. ब्रेडन कार्सने 10 विकेट घेत सामना इंग्लंडच्या दिशेने वळवला. हा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.