मिताली राजचा 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण

सोमवार, 15 मार्च 2021 (11:51 IST)
येथे रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने 45 धावांची खेळी केली. यादरम्यान तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार केला. 
 
अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने 71 चेंडूतील आपल्या खेळीत 4 चौकारही खेचले. मितालीनंतर दुसर्या क्रमांकावर शॅर्लेट एडवड्‌र्स ही असून तिच्या खात्यात 5 हजार 992 धावा जमा आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती