आयपीएलकडे कानाडोळा करता येणार नाही. या टुर्नामेंटमुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे. मला वाटते की, आमच्या या संघातील 12 ते 16 खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जात आहेत. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी आमच्या खेळाडूंना आयपीएलचा अनुभव देणे कठीण होते. आता आमच्या खेळाडूंना त्या स्पर्धेत खूप मागणी आहे. त्यामुळे कदाचित हेच मोठे कारण असू शकते की, आम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन्ही प्रकारात जगात अव्वल क्रमांकावर आहोत. इंग्लंडचे बारा खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
यामधील काही खेळाडूंचे करार हे कोटी रुपांमध्ये झालेले आहेत. यामध्ये जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोईन अली, सॅम कुरेन, टॉम कुरेन, डेव्हिड मलान यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू विविध संघांकडून खेळतील. तसेच आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे व 30 मे रोजी समारोप होणार आहे.
इंग्लंडचा न्यूझीलंडविरुध्दचा पहिला कसोटी सामना 2 जूनपासून सुरू होणार आहे. त्यावर जाईल्स म्हणाले की, आम्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये पाठविण्यासाठी तयार आहोत. या दोन कसोटी सामन्यांचे वेळापत्रक नंतर तयार करण्यात आले. त्यामुळे जरी आमच्या खेळाडूंचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला तरी ते आपल्या टी20 संघासोबतच राहतील यावर सहमती झाली आहे.