भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मालिका आधीच जिंकली आहे.आता वनडे मालिकेची तयारीही सुरू झाली आहे. वनडे मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. विशेष म्हणजे 2024 च्या T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे.
एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सुरू होणार आहे. यानंतर तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. दुसरा वनडे 4 ऑगस्टला आणि मालिकेतील शेवटचा सामना 7 ऑगस्टला खेळवला जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी आणखी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग , रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.