IND vs SL Playing-11 : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा आणि निर्णायक T20 सामना आज , संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

शनिवार, 7 जानेवारी 2023 (16:01 IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईतील पहिला टी-20 भारताने दोन धावांनी जिंकला. त्याचवेळी, गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव करत मालिका एक-एक अशी खिशात घातली.गेल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या अव्वल फळीतील भारतीय फलंदाजांना मालिका जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात राजकोटच्या सपाट खेळपट्टीवर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. 
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन किंवा अधिक सामन्यांची ही सातवी टी-२० मालिका आहे. यामध्ये भारताने आतापर्यंत चार वेळा विजय मिळवला आहे. एकात पराभव तर एक मालिका अनिर्णित राहिली. भारताने आपल्या भूमीवर श्रीलंकेविरुद्ध कधीही टी-२० सामन्यांची मालिका गमावलेली नाही. शेवटच्या वेळी 2021-22 मध्ये झालेल्या मालिकेत भारतीय संघ 3-0 ने जिंकला होता. श्रीलंकेविरुद्धची सलग दुसरी T20I मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे.
 
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
भारत:  हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, ऋतुराज गायकवाड / राहुल त्रिपाठी / वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी.
 
श्रीलंका :  दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ अस्लंका, धनंजय डिसिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश तिस्चना, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, कसून राजिथा.
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती