अभिनेत्री ऋतुजा बागवेला झाला कोरोना

मंगळवार, 21 जुलै 2020 (09:57 IST)
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय ऋतुजाला करोनाची सौम्य लक्षणे जाणवली. त्यामुळे तिला घरातचं क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याबाबत महिती ऋतुजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दोन आठवडे खूप तणावपूर्ण गेले. कारण बाबांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मलासुद्धा सौम्य लक्षणे होती. बाबा रुग्णालयात आणि मी, आई, बहिण घरी क्वारंटाइन असल्याचं तिने सांगितलं. 
 
त्याचप्रमाणे वडील आता घरी आल्याची माहिती देत तिने  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय करण्याचे चाहत्यांना सांगितले आहे. 'खूप सतर्क रहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्य ते सगळे उपाय करा.' अशी पोस्ट करत तिने काळजी घेण्याचे आवाहन केलं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती