एका बाजूला पद्मावती चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असतांना मराठी चित्रपट सुद्धा जोरदार विरोध होत आहे. यामध्ये दशक्रिया हा चित्रपटगृहात तर आला मात्र त्याला जोरदार विरोध होत असून नाशिक, औरंगाबाद आणि पुणे येथे या विरोधात जोरदार घोषणाबाजी करणायत आली आहे. तर औरंगाबाद येथे आज सिनेमाच्या प्रदर्शनावरुन पुरोहित आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आले.