जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ चालूच असण्याचं तज्ञानी सांगितले आहे. युक्रेन -रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशानी वाढ झाली होती.
पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहे. सलग पाचव्या दिवशी दरात वाढ झाली. पेट्रोल 82 तर डिझेल पैशानी महागले आहे. आज सकाळ पासून देशात नवे दर लागू झाले आहेत. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 84 पैशानी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रतिलिटर ने वधारले आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर 113.29 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 पैसे झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 98.61 रुपये आणि डिझेलचा दर 89.97 रुपये आहे.