भाजीपाला बाजार फार अडचणीत

केंद्र शासनाच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर दीड महिना झाला तरी आर्थिक स्थितीत काहीच बदल झाला नाही. याचा फटका अद्यापही अनेक शहरातील भरणाऱ्या आठवडे बाजारालाही बसत असून ना स्वाईप मशीन ना मोेबाईल वॉलेटचा वापर होत आहे. तर दुसरीकडे संपुर्ण बाजारावर नोटबंदीचे सावट दिसून आले.पैसे काय सुट्टे नसल्याने अनेक शहरातील बाजार पेठेतही गर्दी कमी दिसत आहे. 
 
परंतु या सर्वात रोजच्या दैनंदीन उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेला भाजी पाला व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी आठवडे बाजाराला पसंती देत असतात. परंतु चलनाच्या अभावाने आजचा आठवडे बाजारही सुनासुना दिसत असल्याने यावरही नोट बंदीचे सावट अद्याप हटले नसल्याचे आजचे चित्र होते.त्यामुळे आता जेथे पैसे असतील किवा डिजिटल मनी आहे त्याचे काम सुरु आहे असे चित्र आहे.

वेबदुनिया वर वाचा