मुंबई : ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमीटेड, बीएलएस ई सर्व्हिसेस लिमीटेड आणि पॉप्युलर व्हेईकल्स अँड सर्व्हिसेस लिमीटेड या तीन कंपन्या आपला आयपीओ सादर करणार असून या संदर्भातील अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे अलीकडेच सादर केले आहेत.
आयपीओशी संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे वरील तीन्ही कंपन्यांनी सेबीकडे हस्तांतरण केली आहेत. सेबी आता या अर्जांवर विचार करून अर्ज मंजूर करण्याच्या दिशेने वाटचाल करील. ज्योती सीएनसी आपल्या आयपीओमधून 1 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. दुसरीकडे बीएलएस ई सर्व्हिसेस लिमीटेड ही कंपनी आयपीओ अंतर्गत 2.41 कोटी नवे समभाग सादर करणार आहे. पॉप्युलर व्हेईकल ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 150 कोटी रुपये उभारणार आहे.