टाटाकडे सुमारे ३४००० कोटीचे कर्ज आहे. टाटाने टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम फेडणं शक्य होणार आहे. त्यामुळे टाटा अशाप्रकारचा विचार करू शकते. पण अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती टाटाकडून दिली जात आहे. मोबाईल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसने भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली होती, मात्र यामध्ये त्यांना यश आले नसल्याने कंपनीसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.