रडवत असेलल्या कांदाच्या व्यापारीवार्गावर छापे

पूर्ण देशाला आणि शेतकरी वर्गाला नेहमीच योग्य भाव मिळत नाही म्हणून छळत असलेल्या साठवणूक करून फायदा उचलणाऱ्या  कांदा व्यापारी वर्गावर छापे टाकले आहेत. कांदा भावात होत असलेली मोठी वाढ, तर कांदा पिकवत असलेल्या शेतकरी वर्गाला होत नसलेला फायदा हे सर्व पाहत  प्राप्तिकर विभागाने या क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडे तपास सुरु केला आहे.

लासलगाव, येथील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केलीय.नाशिक जिल्हायात कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासगावातील दोन, चांदवडमधील एक, सटाणा येथील एक तर पिंपळगाव बसवंत येथील एक कांदा निर्यातदार, उमराणे येथील एक व येवला येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर आयकर धाडसत्र झाले.
 
याचा निषेध करत उद्या १४ सप्टेंबर रोजी बाजार समिती व्यवहार बंद होणार असून, जवळपास ३०० नवीन ट्रक भरून कांदा लिलावासाठी आला आहे. आजच्या कारवाईत सतीश लुंकड सटाना, खंडू देवरे उमराणे, प्रवीण हेडा चांदवड, ओमप्रकाश राका लासलगाव, संतोष अटल येवला,क्रांतीलाला सुराणा लासलगाव, मोहनलाल भंडारी पिंपळगाव यांच्यावर कारवाई केली आहे.सदर व्यापारी वर्गाने साठवलेला कांदा जप्त केला असून त्याची मोजणी सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती