शशिकांत शिंदेंनी अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास करावा-शंभूराज देसाई

मंगळवार, 4 एप्रिल 2023 (07:28 IST)
उध्दव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच झालाच. तुम्ही त्यांचे वारसदार असाल पण बाळासाहेब ठाकरे यांना कुटुंबापुरतं मर्यादित आणि संकुचित ठेवू नका.जे आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा म्हणजे कोणाकडे खोके गेले कोणाकडे फ्रिज गेले हे कळेल अशी टीका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.  ते साताऱ्यात बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास करावा असा सल्ला ही शंभूराज देसाई यांनी दिला. गेल्या अडीच वर्षात राज्याचे प्रस्ताव केंद्राकडे न गेल्याने निधी पडून राहिला असल्याचेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मीडियाने संजय राऊतांना टीव्हीवर दाखवण कमी करा. संजय राऊत सकाळी टिव्हीवर आले की लोक चॅनल बदलतात याचा सर्व्हे करा. जिल्ह्यात अशी नियंत्रण व्यवस्था होत असेल तर मी याचे सॅम्पल करून दाखवतो असे आवाहन शंभूराज देसाई यांनी दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपलब्ध निधी 100 रुपयांचा असायचा आणि मंजुऱ्या 1000 रुपयांच्या असायच्या याउलट या सरकारच्या काळात आमच्याकडे असणारे उत्पन्न, वर्षातून येणारा निधी त्यासाठी लागणारी तरतूद करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती