SBI, HDFC, ICICI ने वाढवले FD वर व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा
तुम्ही जर मुदत ठेव (FD) घेणार असाल तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI),अॅक्सिस बँक (HDFC)आणि ICICI बँकेसह देशातील अनेक प्रमुख बँकांनी मुदत ठेवींच्या (FD)व्याजदरात वाढ केली आहे.
SBI मधील दर: SBI FD व्याज दर 22 ऑक्टोबरपासून लागू होणार्यानुसार, बँक सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 6.90 टक्के व्याज देत आहे. एफडी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्यानुसार व्याजदर ठरवला जाईल.