Gold Price Today: लगीनसराईत सोन्याचा भाव जाणून घ्या

सोमवार, 6 डिसेंबर 2021 (19:04 IST)
लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. कमोडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत सहाव्या दिवशी वाढ झाली असून सोन्याचे दर 79 रुपयांनी वधारले असून 47884 रुपये झाले आहे. आज सोन्याचे दर 48047 रुपयांनी  वाढले होते. चांदीच्या दरा बद्दल बोलायचे तर चांदीच्या दरात 114 रुपयांनी वाढ झाली असून चांदीचा भाव 62401 रुपये झाला. 
सध्या आंतरराष्ट्रीय देशांनी ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रकरणाला बघता त्याचे प्रसरण रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची तयारी केली आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडण्याची शक्यता निर्माण होण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन आणि चांदीकडे वाढत आहे.तसेच फेडरल रिझर्व्ह ने देखील बॉण्ड खरेदी बंद करण्याचे संकेत दिले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती