आनंदाची बातमी: सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त होईल!

मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (17:03 IST)
सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या बातम्या येत आहेत. या सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त होऊ शकते. होय .. खाद्यतेलाच्या किमती खाली येऊ शकतात. वास्तविक, केंद्र सरकार सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पूर्ण तयारीत आहे.
 
केंद्र सरकारने राज्यांना या सणासुदीच्या हंगामात आयात शुल्कात कपात केल्याचा लाभ "ताबडतोब" ग्राहकांना देण्यास सांगितले आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने (मोदी सरकारने) कच्च्या तेलाच्या जातींवरील मूलभूत सीमाशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सरळ सांगायचे झाले तर,  सरकारने पाम तेल आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्यूटी कमी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती