उल्लेखनीय आहे की इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीप्रमाणे डिसेंबर 2008 मध्ये व्हिडिओकॉन समूहाचे मालक वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर आणि त्यांच्या दोन साथीदारांसोबत ज्वाइंट वेंचर बनवले. नंतर कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे लोन काढण्यात आले. नंतर कंपनीचा हक्क मात्र 9 लाख रुपयात त्या ट्रस्टला सोपवण्यात आला ज्याची सूत्र दीपक कोचर यांच्या हातात होती.
ज्वाइंट वेंचर हस्तांतरणाने 6 महिन्यापूर्वी व्हिडिओकॉन ग्रुपने आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपये लोन घेतले होते. 2017 साली जेव्हा व्हिडिओकॉनवर 86 टक्के लोन अमाउंट अर्थात 2810 कोटी रुपये शिल्लक होते बँकेने हे अमाउंट एनपीए घोषित केले. आता या प्रकरणात चौकशी समिती धूत-कोचर-आयसीआयसीआय यांच्यात देण-घेण संबंधी तपासणी करत आहे.