राज्य सरकारने विदेशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विदेशी दारू 18 ते 20 टक्क्यांनी महागणार आहे. राज्य सराकारच्या या निर्णयामुळे जवळपास 500 कोटींचा नफा सरकारला होणार असून सरकारी तिजोरीत 500 कोटींचा महसूल वाढणार आहे. ताज्या ट्रेंडनुसार विदेशी आणि देशी मद्यापेक्षा बिअरला जास्त पसंती मिळत असल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून येत आहे. मद्यविक्रीच्या भरारीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूलही झपाट्याने वाढतो आहे.