नोटबंदीची 5 वर्षे: डिजिटल पेमेंटमध्ये भरभराट झाली, परंतु रोख रकमेचा प्रवाह वाढला

सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (10:23 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. आता नोटाबंदीला 5 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही नोटांद्वारे होणारे व्यवहार हळूहळू पण सातत्याने वाढत आहेत. मात्र, या काळात डिजिटल पेमेंटमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यावरून भारत हळूहळू कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. 
 
गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला. आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात कोविड-19 मुळे सावधगिरी म्हणून लोकांनी रोखीचा अधिक वापर केला आहे. या काळात नेट बँकिंग, प्लास्टिक कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून होणारे व्यवहारही वाढले आहेत. या सगळ्यात UPI लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. 
 
RBI डेटा काय सांगतो 
RBI च्या ताज्या आकडेवारीनुसार, 4 नोव्हेंबर 2016 रोजी 17.74 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम चलन मध्ये होती .29 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढून 29.17 लाख कोटी रुपये झाली. आकडेवारीनुसार, मूल्य आणि प्रमाणाच्या बाबतीत, 2020-21 या आर्थिक वर्षात अनुक्रमे 16.8% आणि 7.2% वाढ झाली आहे, तर 2019-20 मध्ये 14.7% आणि 6.6% ची वाढ झाली आहे. 
 
UPI कडे लोकांचा कल वाढला- 
2016 मध्ये UPI लाँच करण्यात आले होते, त्यानंतर याद्वारे पैसे भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये UPI द्वारे 421 कोटी व्यवहार झाले. UPI च्या माध्यमातून 7.71 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला.  
 
तज्ञांचे मत काय आहे 
तज्ञांच्या मतानुसार,नोटबंदीनंतर लगेचच याबद्दल काही शंका निर्माण झाल्या होत्या. पण हळूहळू गोष्टी सुधारत आहेत. तज्ज्ञ म्हणतात की रोख चलन पूर्णपणे संपले आहे असे म्हणता येणार नाही. त्यात लक्षणीय घट झाली आहे. तथापि, लोक अजूनही 500 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी रोख अधिक वापरत आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती