कोरोनाच्या या कठीण प्रसंगात डॉक्टार आणि नर्स मोठ्या हिंमतीने काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने जाहीर केले की, २०२० च्या अखेरीस ते डॉक्टर आणि परिचारिकांना हवाई तिकीटात २ टक्के सवलत देणार आहेत. एअरलाइन्सने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, “परिचारिका व डॉक्टरांनी आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून तपासणीच्या वेळी रुग्णालयाचा वैध आयडी दाखवणे गरजेचे आहे. इंडिगोने या योजनेला ‘टफ कुकी’ अभियान असे नाव दिले आहे.
नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी ट्विटरवर सांगितले की १ जुलै रोजी ७१,४७१ प्रवाश्यांनी ७८५ विमानात प्रवास केला. याचाच अर्थ बुधवारी सरासरी ९१ प्रवाश्यांनी विमानात प्रवास केला. सामान्यत: वापरल्या जाणार्या ए ३२० विमानात जवळपास १८० जागा असल्याने १ जुलै रोजी प्रवाशांची संख्या जवळपास ५० टक्के होती.