सर्व जण त्वचेची आणि केसांची निगा राखतो, त्यासाठी पूर्ण काळजी घेतो, परंतु पायांकडे किती लक्ष दिले जाते ह्याचा विचार कोणीही करत नाही. जेवढी काळजी त्वचेची आणि केसांची घ्यावयाची असते तेवढीच काळजी पायांची देखील घ्यावयाची आहे.
1 साखर आणि लिंबू स्क्रब -हे स्क्रब तयार करण्यासाठी 1 वाटी मध्ये 2 चमचे साखर घ्या. या मध्ये अर्धा लिंबाचा रस मिसळा. चांगल्या प्रकारे, मिक्स करून आपल्या पायांना स्क्रब करा. ह्याचा वापर केल्यानं पायाची टॅनिंग देखील दूर होईल.
2 बेबी ऑइल आणि मिठाचे स्क्रब- हे स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला 2 मोठे चमचे बेबी ऑइल घेऊन या मध्ये 1 चमचा मीठ मिसळा. या पेस्टने आपले पाय स्क्रब करा. काही वेळ पायांना गरम पाण्यात बुडवून ठेवा, नंतर हळुवार हाताने पूर्ण पायांना स्क्रब लावा, नंतर स्वच्छ पाण्याने पायाला स्वच्छ करा.