हात सुंदर दिसण्यासाठी हे उपाय करा

मंगळवार, 16 मार्च 2021 (09:40 IST)
चेहऱ्या प्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्यासाठी काही उपाय आहेत जे सोपे आणि नैसर्गिक आहे. या मुळे हात मऊ आणि सुंदर राहतात. चला तर मग जाणून घेऊ या.   
 
* अँटी एजिंग क्रीम वापरा- आपण अँटी एजिंग क्रीम चेहऱ्यावर तर लावतातच. पण हातावर मॉइश्चराइझझर व्यतिरिक्त आपण सनस्क्रीन देखील लावा. हे आपल्या हातांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवेल. या मुळे टॅनिग देखील होणार नाही. घरातून बाहेर जाताना आपण सनस्क्रीन लावा.  
 
* तेलाने मॉलिश करा-कपडे किंवा भांडी स्वच्छ करताना डिटर्जंट मुळे हात खराब आणि कोरडे रुक्ष होतात. या साठी आपण झोपण्यापूर्वी हाताला तेलाने मॉलिश करावी हातासह हे बोटाना देखील निरोगी ठेवतात.
 
*नेलं पॉलिश लावण्याची पद्धत- नेलं पॉलिश तिचं वापरा ज्याच्या मध्ये सल्फेट नसावे. बऱ्याच वेळा आपण नेलपॉलिश चे दोन थर लावतो .एका थर लावल्यानंतर दुसरा थर लावू नका. या मुळे हात स्वच्छ आणि चमकदार दिसतील. 
 
* नखांना मजबूत ठेवा- नखांना मजबूत करण्यासाठी आपण लसणाचं तेल देखील लावू शकता. किंवा कोमट पाण्याने नखे स्वच्छ करू शकता जेणे करून आपले हात आणि नखे स्वच्छ दिसतील.   
 
* ग्लव्ज वापरा- काम करताना ग्लव्ज वापरा. जेणे करून धूळ,माती,भांड्यातील तेल ,हातांना खराब करू शकतात. असं होऊ नये या साठी आपण कपडे धुताना किंवा बागकाम करताना ग्लव्ज वापरू शकता.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती