Manipur Election: काँग्रेसने मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. सगोलाबंद विधानसभा मतदारसंघातून एम मोमो सिंग, यास्कूलमधून एन हेलेंद्रो सिंग आणि जिरीराममधून बद्रुर रहमान यांना तिकीट देण्यात येत आहे. 22 जानेवारी रोजी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन लोकेन सिंग यांच्या नावांसह 40 उमेदवारांची घोषणा केली होती.