राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे सरकार उलथवून शिवसेना-भाजप युती सत्तेत येईल, असा विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.
मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभेवेळी बाळासाहेब आजारी असल्याने मतदान करू शकले नव्हते. त्यामुळे बर्याच दिवसानंतर घराबाहेर पडलेल्या बाळासाहेबांना पहायला मोठी गर्दी झाली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की या निवडणुकीनंतर शिवशाहीच राज्यात सत्तेत येईल. बाळासाहेबांबरोबर यावेळी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, नातू आदित्य आणि सून रश्मी होते.
ही तर कॉंग्रेसी संस्कृती- राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालमोहन विद्यामंदिर येथे मतदान केले. कॉंग्रेसचे आमदार जनार्दन चांदुरकर यांना पैसे वाटप केल्याबद्दल अटक केल्याप्रकरणी राज यांना विचारले असता, ती त्यांची संस्कृती आहे. त्याच जोरावर ते इथपर्यंत पोहोचल्याची टिप्पणी त्यांनी केली. यावेळी पैसे वाटपाचे प्रकार जास्त घडल्याचे निरिक्षणही त्यांनी मांडले.