दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

शुक्रवार, 17 मे 2024 (09:05 IST)
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. या साठी पक्ष आणि विपक्ष आपापल्यापरीने प्रचार सभा घेत आहे. या 13 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी सज्ज असून आज मुंबईत प्रचारसभा घेणार आहे.

आज मुंबईच्या शिवाजीपार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार आहे. मौम्बी, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, या जागेंवर महायुतीच्या सहा उमेदवारांसाठी पंतप्रधान स्वतः सभा घेणार आहे. या सभेचे टिझर मनसेने प्रसिद्ध केले आहे. तर आज इंडिया आघाडीची सभा बीकेसी मैदानावर होणार आहे. या साठी इंडिया आघाडीने मोठं शक्ती प्रदर्शनासाठी तयारी केली आहे. 

एकनाथ शिंदे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार असून हा रोड शो ऐरोली विधानसभा क्षेत्रात वाशी ते ऐरोली पर्यंत होणार आहे.

आज बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची महासभा होणार आहे. उद्धव ठाकरे  यांनी मुंबई महापलिकडे शिवाजी पार्कवर सभेची मागणी केली होती. परंतु मनसेने आधी अर्ज दिले होते.  त्यामुळे हे मैदान मनसेला देण्यात आलं. इंडिया आघाडीची सभा बीकेसी मैदानावर होणार असून या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहे. 

Edited by - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती